HPV लसीकरण मोहिमेला वेग; देशभरात 52.10 लाखांहून अधिक मुलींना मोफत लस, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध केंद्राची व्यापक मोहीम.
देशभरात गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, 15 जुलै 2026 पर्यंत देशातील 52,10,302 मुलींना HPV लस देण्यात आली आहे. ही मोहीम 28 फेब्रुवारी 2026 रोजी देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू करण्यात आली होती.
