पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजित भेटींचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार सर्व परिमंडळातील पोलीस उपायुक्त आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित पोलीस ठाण्यांना प्रत्यक्ष भेट देणार आहेत.
या भेटीदरम्यान पोलीस उपायुक्त संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये उपस्थित राहून प्रलंबित गुन्हे, तक्रार अर्ज तसेच तपासाशी संबंधित कामकाजाची सविस्तर पाहणी करतील. तसेच प्रकरणांच्या तपासात आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शनही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 16 जुलै 2026 रोजी समर्थ, सहकारनगर, वारजे, बाणेर, लष्कर, हडपसर आणि वाघोली पोलीस ठाण्यांना भेट दिली जाणार आहे.
21 जुलै 2026 रोजी विश्रामबाग, स्वारगेट, न्हेरे, येरवडा, कोंढवा, फुरसुंगी आणि लोणीकंद पोलीस ठाण्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
22 जुलै 2026 रोजी डेक्कन, भारती विद्यापीठ, उत्तमनगर, विश्रांतवाडी, बंडगार्डन, मांजरी आणि खराडी पोलीस ठाण्यांना भेटी नियोजित आहेत.
23 जुलै 2026 रोजी फरासखाना, बिबवेवाडी, कोथरूड, लक्ष्मीनगर, वानवडी, मुंढवा आणि लोहगाव पोलीस ठाण्यांची पाहणी केली जाणार आहे.
28 जुलै 2026 रोजी खडक, पर्वती, सिंहगड रोड, खडकी, कोरेगाव पार्क, लोणी काळभोर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांना भेट दिली जाईल.
29 जुलै 2026 रोजी समर्थ मार्केटयार्ड, नांदेड सिटी, बाणेर, कोंढवा, मुंढवा आणि लोणीकंद परिसरातील संबंधित पोलीस ठाण्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
30 जुलै 2026 रोजी शिवाजीनगर, आंबेगाव, चतु:श्रृंगी, येरवडा, काळेपडळ आणि चंदननगर पोलीस ठाण्यांना वरिष्ठ अधिकारी भेट देतील.
या सर्व भेटींमध्ये प्रलंबित गुन्हे आणि तक्रार अर्जांच्या तपासाचा आढावा घेऊन तपास प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.