दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्लीसाठी गुरुवारी 'रेड अलर्ट' जारी केला असून दिवसभर मध्यम ते मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशारा दिला आहे.
