भारत–स्पेन आर्थिक सहकार्याचा नवा अध्याय; पीयूष गोयल यांच्या स्पेन दौऱ्यात महत्त्वाचे निर्णय.

 


स्पेनचे प्रथम उपपंतप्रधान आणि अर्थव्यवस्था, व्यापार व व्यवसाय मंत्री कार्लोस कुएर्पो काबालेरो यांच्यासोबत झालेल्या बैठकीत द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, बाजारपेठेतील प्रवेश, पुरवठा साखळी तसेच अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, प्रगत उत्पादन, डिजिटल तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा झाली. भारत–ईयू मुक्त व्यापार कराराबाबतही दोन्ही बाजूंनी विचारांची देवाणघेवाण केली.

यानंतर उद्योग आणि पर्यटन मंत्री जोर्डी हेरेऊ बोहेर यांच्यासोबत शाश्वत उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, वाहन उद्योग, रेल्वे, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि पर्यटन क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा झाली. 'मेक इन इंडिया' अंतर्गत सुरू असलेल्या C-295 कार्यक्रमाचे औद्योगिक सहकार्याचे यशस्वी उदाहरण म्हणून दोन्ही देशांनी स्वागत केले.

दौऱ्यात आयोजित भारत–स्पेन बिझनेस फोरममध्ये दोन्ही देशांतील उद्योगपती आणि सरकारी प्रतिनिधींनी व्यापार व गुंतवणुकीच्या नव्या संधींचा आढावा घेतला. पीयूष गोयल यांनी भारतातील वेगवान आर्थिक वाढ, सुधारणा आणि उत्पादन, पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, डिजिटल अर्थव्यवस्था व नवोपक्रम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधींची माहिती देत स्पॅनिश कंपन्यांना भारतात अधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

तसेच ICEX Spain Trade and Investment च्या अधिकाऱ्यांसोबत गुंतवणूक वाढविणे आणि उद्योगांमधील सहकार्य मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. या दौऱ्यामुळे भारत–स्पेन व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्याला आणखी बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Followers